Marathi Ukhane | नवीन मराठी उखाणे

लग्न म्हंटलं की उखाणे आलेच ,लग्नसामारंभात प्रत्येक जन वर आणि वधू ला Marathi Ukhane नाव घेण्यासाठी आग्रह केला जातो .तेव्हा दोघांनाही उखाण्या द्वारे नाव घ्यावे लागते .या पोस्ट मध्ये खास नवरीसाठी उखाणे [ MARATHI UKANE FOR FMALE] आणि नावरदेवासाठी उखाणे [ MARATHI UKHANE FOR MALE ]लिहिले आहेत .

MARATHI UKHANE FOR FEMALE – नवरीसाठी मराठी उखाणे

MARATHI UKHANE FOR MALE – नवरदेवासाठी मराठी उखाणे

ROMANTIC MARATHI UKHANE – रोमँटिक मराठी उखाणे

SATYANARAYAN POOJA UKHANE IN MARATHI – सत्यनारायण पूजेसाठी उखाणे

MAKAR SANKRANTI UKHANE IN MARATHI – मकरसंक्रांती सणासाठी उखाणे

MARATHI UKHANE FOR FEMALE नवरीसाठी मराठी उखाणे

1]ओरडून ओरडून बसला माझा घसा ,
……………….रावांचे नाव घेते सगळ्यांनी शांत बसा .

2]लाकडाचा आहे पाटा ,पाट्याच लाकूड आहे चंदन ,
…………………..रावांचे नाव घेते देवाला करून वंदन .

3]वाटीत वाटी चांदीची वाटी,
…………………रावांचे नाव घेते जुळल्या आमच्या रेशीम गाठी .

4]पाण्यात चालते नाव
………………….रावांसोबत लग्न झालं आयुष्य झालं wow .

5]महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पाण ,
………………..रावांचे नाव घेते ते आहेत खूप छान .

6]पुण्याची माझी पैठणी , नाशिक ची आहे नथ ,
…………………..राव आहेत माझ्यासाठी गुडलक .

7]तिळासारखा स्नेह ,गुळासारखी असावी गोडी ,
ईश्वर सुखी ठेवो माझी आणि ………………………रावांची जोडी .

8] सासरची मंडळी खूप आहेत हौशी
……………..रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी .

9]मे महिना म्हणजे लग्नाचा सीजन आणि
………………………रावांचे नाव घ्यायला भेटले आहे आज रिजन .

10]खूप खूप पहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटले काशी

…………………….रावांच नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी .

11]सोन्याची सुई पितांबराच्या घोळात
…………..रावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेळात .

12] हातात भरलं हिरवा चुडा आणि गळ्यात घातली चिंचपेटी,
………… रावांचे नाव घेते नशिबाने जुळल्या आमच्या रेशीमगाठी .

MAKAR SANKRANTI UKHANE IN MARATHI – मकरसंक्रांती सणासाठी उखाणे

1]आली आली संक्रांत , घ्या सौभाग्याचं वाण ,
………………..राव आहेत प्रेमळ , जशी आनंदाची खान .

2]महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज ,
…………………रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज .

3]आई वडिलांसारखी माया , नसते कोणाला
……………..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला .

4]आज संक्रांत म्हणून दाराला बांधले तोरण
…………………..रावांचे नाव घेते हळदी कुंकूंकवाचे कारण .

5]देवापुढे ठेवण्यासाठी ,आणले नारळ आणि केळी
……………………..रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या वेळी .

6]एका आठवड्यात, दिवस असतात सात
…………..रावांचे नाव घेते आज आहे मकरसंक्रांत .

7]संक्रांतीच्या दिवशी, तिळाचे काढते सत्व
…………..रावांचे नाव घेते आज हळदीकुंकवाचे महत्त्व .

9]मराठ मोळे सण आहेत किती छान
…………….रावांची पत्नी असल्याचा मला अभिमान .

10]तिळासारखा स्नेह ,गुळासारखी असावी गोडी ,
ईश्वर सुखी ठेवो माझी आणि ………………………रावांची जोडी .

HALDI KUNKU MARAHI UKHANE – हळदी कुंकू मराठी उखाणे

हळदी कुंकू मराठी उखाणे

1]गणपतीला वाहते दुर्वा , विठ्ठलाला वाहते तुळस
…………….रावांचे नाव घेण्यासाठी नाही मला आळस .

2]आकाशी चमकती तारे , जमीन चमकती हिरे
……………..रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे

3]बागेची शोभा वाढविण्यासाठी, कष्ट घेतो माळी
…………….रावांचे नाव घेते हळदीकुंकुवाच्या वेळी .

4]सुवासिनींना शोभून दिसत , गळ्यामध्ये डोरलं
………………रावांचे नाव मी हृदयामध्ये कोरलं .

5]झाडाच्या फांदीवर गात होती, पक्षांची जोडी
…………………..रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी .

6]खडीसाखरेची गोडी आणि चाफ्याचा सुघंध ,
…………….रावांच्या संसारात मिळतो स्वर्गाचा आनंद .

7]मंगळसूत्राच्या जोडीला असतात काळे मणी ,
……………..राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी .

8]नवीन रेसिपी करण्याचा मला आहे छंद ,
…………….रावांचे नाव घेताना मनाला होतो आनंद .

9]नागपूरची संत्री , जळगाव ची केळी
……………..रावांचे नाव घेते हळदीकुंकवाच्या वेळी .

10]दोन जीवांचे मिलन होऊन जुळल्या सातजन्माच्या गाठी ,
………………….रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी .

11]द्राक्षाच्या वेलीचे त्रिकोणी पान ,
…………………रावांचे नाव घेते सर्वाना ठेवून मान .

12]मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध ,
………………रावांसोबत मिळाला मला जीवनाचा आनंद .

13]अंगणात आहे तुळस, तुळशीला लावते दिवा
……………………रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा .

1 thought on “Marathi Ukhane | नवीन मराठी उखाणे”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top